मानवी घटकांचा ऐतिहासिक वास्तूवर होणारा
परिणाम
इ.स.वि.सणापासून म्हणजेच सुमारे
३०० ते ४०० वर्षापूर्वीपासून आपल्या भारत्य देशाला ऐतिहासिक वास्तूंचे रुपांतर एक
महान अशी देणगी मिळालेली आहे. या ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या देशाचे ऐतिहासिक
महत्व जगाच्या कानाकोपऱ्यात जावून पोहचण्यास फार मोठी मदत झालेली अआहे. कारण या
ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या देशाला जगातील काही महत्वाच्या पर्यटन स्थळापैकी एक
महत्वाचे स्थळ म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे. ऐतिहासिक वास्तूंमुळे आपल्या
देशाचे आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून आपल्या देशाचा इतर देशांशी
सलोखा निर्माण होत आहे. जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून आपल्या देशात विविध प्रकारचे
लोक येवून एकमेकांच्या संस्कृतीची माहिती करून घेत आहेत. वरील सर्व फायदे ऐतिहासिक
वास्तूंमुळे होत असेल तरी त्यांच्या विनाशास व दुष्प्रीनामास मानवी घटकच जबाबदार
असल्याचे आपल्या ध्यानात येते.कारण पर्यटन
स्थळांमुळे मानवी घटक वारंवार ऐतिहासिक वास्तूंना भेटी देत असल्यामुळे ऐतिहासिक
वास्तूंचे सौदर्यावर त्याचा फार मोठा विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येते. या
दुष्य्प्रीनामाची गंभीरता कशा प्रकारची आहे हे दुष्परिणाम रोखण्यासाठी कोणत्या
उपाययोजना कराव्यात ऐतिहासिक वास्तूंचे अस्तित्व नाहीसे झाल्यास त्याचा आपल्या
देशाचे प्रगतीवर कोणकोणत्या स्वरूपाचे परिणाम होवू शकतील या सर्व परिणामांची
परिणामता या प्रात्यक्षिका मार्फत समजावून घेणार आहोत.
गड- किल्ले, संस्कृती, इतिहासांच्या पानांचे, चरित्रांचे होणारे विकृतीकरण
आता थांबवा,'
प्राण्यांच्या विविध जाती नष्ट
होत असल्याचा उल्लेख करताना गडांची दुरावस्था होत आहेत.
·
प्राचीन वारसा
नष्ट होण्याच्या मार्गावर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला
निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या
भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते. पण,
महाभारतकालीन
राजा विराटपासून गोंडराजांपर्यंतच्या वैभवशाली राजवटीची साक्ष देणारी
·
ऐतिहासिक स्थळे आता नामशेष होताना
दिसत आहेत. या ऐतिहासिक स्थळांच्या जतनाकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष
होत असताना शासनही याबद्दल उदासीनच दिसत आहे. एरवी छोट्या-छोट्या बाबीसाठी रान
उठविणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या मुद्यांवर अधिवेशनात एक शब्दसुद्धा बोलताना
दिसत नाहीत.
झाडीपट्टीत मोडणाऱ्या या जिल्ह्यात वैरागडचा
किल्ला,
भंडारेश्वर
मंदिर,
अरततोंडी,
विदर्भाची
काशी अशी ओळख असलेले मार्कंडेश्वर मंदिर, निसर्गरम्य
टिपागड अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.
आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर
मंदिर व ऐतिहासिक किल्ला शेवटच्या घटका मोजत आहे. येथील किल्ल्यांची अवस्था अतिशय
दयनीय झाली आहे. भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी मागील वर्षभरापासून
खोदकाम करून ठेवले आहे. पण, शासनाचे उदासीन
धोरण व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. वैरागड
येथे हिऱ्याची खाण असल्याचा प्राचीन इतिहासात उल्लेख आहे. संशोधनाअंती येथे हिरे
असल्याचेही सिद्ध झाले आहे. मात्र, या
परिसराचा विकास करण्याचे कोणतेच धोरण शासनाने कधी आखले नाही. चामोर्शी तालुक्यातील
वैनगंगा नदीच्या तीरावर मार्कंडेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिल्पाकृती खजुराहो
येथील शिल्पाकृतीच्या तोडीच्या आहेत. पण या शिल्पाकृतीचे व मंदिराचे जतन करण्याचे
वेगवान प्रयत्न अद्यापही झाले नाही. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते. या
यात्रेसाठीही जागा उपलब्ध करून देण्याकडे शासन कानाडोळा करीत आहे. विशेष म्हणजे
मार्कंडेश्वर मंदिरासारखी आणखी काही मंदिरे जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे.पण,
येथे
इतिहास संशोधकही फिरकत नाहीत. त्यांच्या संशोधनाला वाव मिळेल,
त्यांना
प्रोत्साहन मिळेल यासाठीही कोणतेच प्रयत्न होत नाही. इतिहास संशोधकांना येथे
पाचारण करण्यात आल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे अवशेष
निश्चित मिळू शकतात.पण, असंख्य
समस्यांच्या विळख्यातील या जिल्ह्यातील हा ऐतिहासिक वारसा समस्येने ग्रस्तच आहे.
·
विदर्भाची काशी मार्र्कं डा
शासनाच्या लेखी दुर्लक्षित
उत्तर वाहिणी असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर
मार्र्कं डा येथे हेमाडंपंथीय शिव मंदिर आहे. सदर शिव मंदिर ऐतिहासिक व प्राचीन
असून या मंदिराला विविध समस्यांनी घेरलेले आहे. येथील मंदिराचा मुख्य कळस ५०
वर्षांहून अधिक काळापासून कोसळलेल्या स्थितीत असून तो पूर्ववत दुरूस्त करण्याकडे
पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या मंदिर समुहातील अनेक मंदिरांची पडझळ
झाली असून याची जुन्या पद्धतीने पूर्नबांधणी करण्याचे कामही प्रशासकीय स्तरावर
रखडलेले आहे. या मंदिराला यात्राकाळात मोठ्या जागेची गरज राहते. परंतु ही जागाही
उपलब्ध झालेली नाही. खासदार, आमदार
यांच्याकडे मंदिराच्या समस्यांबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु
शासनस्तरावरून कमालीची उदासीनता या संदर्भात दिसून येत आहे.
पर्यटकांची पावलेही अडखळतात
निसर्गाचा अमुल्य ठेवा व अनेक ऐतिहासिक,
प्राचीन
मंदिरे,
शिल्पे
या जिल्ह्यात असली, तरी नक्षलवादाचा शाप भोगणाऱ्या या
जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची पावले वेशीवरच अडखळतात. देशाच्या अन्य भागात कमी
प्रतीची जंगले व थातूरमातूर बाबी असल्या, तरी तिथे
पर्यटकांची झुंबड उडते. मात्र गडचिरोली याबाबत दुर्लक्षित ठरली आहे. पर्यटक आता
कुठे काही प्रमाणात हेमलकसा येथे येताना दिसून येत आहे.
·
क्षणोक्षणी वाढत जाणारी लोकसंख्या
औद्योगिक क्रांतीमुळे शहरी लोकसंख्येत सतत पडत जाणारी भर आणि माणसाची हाव यांमुळे
प्रदूषण वाढतच गेले. यामुळे निर्माण होणार्या अनेक प्रकारच्या समस्या,दुष्परिणाम
यांविषयी पर्यावरण विशषज्ञम्प्;ाम्प्;ा
आणि लोकसंख्येचे अभ्यासक डेमोग्राफर्स यांनी फार पूर्वीच इशारा देऊन ठेवला होता.
प्रदुषण आणि लोकसंख्या या भस्मासूरांना वेळीच आवरले गेले नाही तर जगात अनेक गंभीर
समस्या निर्माण होतील. त्यांच्या या इशार्याची गंभीरपणे तातडीने दखल घेण्याची वेळ
आली पण त्यासाठी गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात अस्त्रे यांचा वापर म्हणजे सगळया
जीवसृष्टीचाच संहार आहे. हे कळूनसूध्दा आपल्या चूका दुरुस्त करण्यासाठी माणूस तयार
होईना, पण
जेव्हा जगभर अशा काही घटना घडत गेल्या की त्यामुळे पर्यावरणाची समस्या ही स्थानिक, एखाद्या
देशापुरतीच नसून ती जागतिक समस्या आहे, हे
माणसाला हळूहळू का होईना पटत गेली. तसेच गेल्या पन्नास पंचावन्न वर्षात
पर्यावरणाचे जड्: व्याळ भयानक स्वरूप दाखविण्यार्या घटना घडल्या त्यामूळे मानवजात, प्राणिमात्र
आणि निसर्ग संपज्ञ्ल्त्;ाी यांची
अपरिमित हानी झाली. त्यांचा परिणाम म्हणून अनेक चर्चा, विचारविमर्श
परिसंवाद चळवळी अशांची मालिकाच सगळीकडे सुरु झाली
६ ऑगस्ट १९४५ :अमेरिकेने
जपानमधल्या हिरोशिमा शहरावर अणुबॉब टाकला. त्यात एक लाख तीस हजार नागरिक मरण पावले
व लाखो जबर जखमी झाले शहराचा ९०टक्के भाग त्यात उदध्वस्त झाला. काही दिवसांनी
नागासाकी शहरावर असाच बॉंब टाकण्यात आला. या घटनांना अर्धे शतक होऊनही त्या
अणुस्फोटचे दुष्परिणाम आजही तेथील नागरिकांना भोगावे लागत आहेत.
१ मार्च १९५४ :पॅसिफिकमधील
मार्शल बेटावर अमेरिकेने पहिला हायड्रोजन बाँब फोडला. रोंगलॅप बेटांकडे वाहणार्या
वार्यामधुन त्या स्फोटामूळे निर्माण झालेले किरणोत्सर वाहत गेल्यामूळे त्या
ठिकाणच्या नागरिकांमध्ये कॅन्सर बळावला. काही जणांमध्ये जन्मजात विकृती निर्माण
झाल्या.
१९५६ : जपानमध्ये
मिथाईल मक्र्युरीची विषबाधा होऊन हजार एक लोक मरण पावले तीन हजारांना अंधत्व आले.
तर इतर हजारोंना मेंदूत बाधा झाली. चिसो नावाच्या कंपनीने आपल्या कारखान्यातील
पारा मिनिमाटा उपसागरात ओतून दिला होता. हा पारा माशांच्या, पक्ष्यांच्या
पोटात गेला व त्यामुळे ते मासे, पक्षी
खाणार्यांना विषबाधा झाली होती. ही विषबाधा काही वर्षानंतर लक्षात आली.
१९६२ : रॅशेल
कार्झन याने सायलेंट संप्रिग हे पुस्तक अमेरिकत प्रकाशित झाले. जंतुनाशकांच्या
बेसुमार वापरातून त्याचे पृथ्वी व सभोवताल यांच्यावर भयानक परिणाम यांचे पुस्तकात
साधार विवेचन केले आहे. या पुस्तकामुळे वादळी चर्चा घडून आल्या व त्याचा परिणाम
अमेरिकेत डीडीटीवर बंदी घालण्यात आली.
१९६५ :फ्रान्स
सरकारने वातावरणातील अणुचाचण्यांना प्रारंभ केला त्या १९७४ पर्यत चालूच राहिल्या
म्युरुओरा बेटाखाली शंभराहून अधिक भूमिगत चाचण्या झाल्या. या बेटाबाबतचा
आरोग्यविषयक अहवाल फ्रेंचांनी प्रसिध्द करण्याचे १९६३ नंतर थांबविले.
१९६७-१९७५:व्हिएतनामच्या
युध्दांत अमेरिकेने जंगलातून एजंट ऑरेंज या वनस्पतिनाशक विषारी द्रव्यांचा प्रचंड
मारा केला त्यामूळे नद्या प्रदूषित झाल्या. गर्भपात व जन्मजात दोषांचे परिणाम
भयानक वाढले.
१९७२ :पाच जून ते
१६ जूनच्या दरम्यान मानवी पर्यावरणाबाबत स्टॉकहोम या स्वीडनमधील शहरात परिषद भरली.
त्यामूळे जगभर पर्यावरण, या विषयाची
चर्चा सूरु झाली. पर्यावरणाला बाधक, हानिकारक
होणार नाही असा विकास, अण्वस्त्र चाचण्यावंर जागतिक
बंदी, विकसनशील
देशांना पर्यावरणविकासाठी आर्थिक साहाय्य आणि ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन हे
परिषदेने प्रमुख ठराव केले.
१९७४ :भारतात
चिपको आंदोलनाला सुरुवात गढवाल जिल्हयातील स्त्रिया वृक्षतोडीविरुध्द उपाय म्हणून
झाडांना कवटाळून बसू लागल्या.
१९७७ :आफ़्रिकेतील
नैरोबी विद्यापिठातील एक प्राध्यापक वांगारी माथाई यांनी दि ग्रीन बेल्ट मुव्हेंमट
सुरु केली. त्या चळवळीतून एक कोटी झाडे लावण्यात आली. पन्नास हजारांपेक्षा जास्त
माणसे यात सामील झाली. आजही ही चळवळ चालू असून तिच्यामार्फ़त उत्पन्नाची साधने
निर्माण करणे व जलसंवर्धन वृक्षारोपणाचे कार्य केले जाते.
१९७८ :अमेरिकेतील
न्युयार्क शहरात लव्ह कॅनॉल भागात नव्याने वस्ती करण्यात आली. नंतर असे आढळले की
या भूमीखाली पूर्वी औद्योगिक प्रक्रियेतून निर्माण झालेली टाकाऊ विषद्रव्ये
पुरण्यात आली होती. त्याचा परिणाम होऊन त्या वस्तीत गर्भपाताचे प्रमाण तिपटीने
वाढले. तसेच बालकांमध्ये जन्मजात दोषांचे प्रमाणही वाढले. स्थानिक नागरिकांनी लुई
गिब्ज यांच्या नेतृत्वाखाली हे प्रकरण उघडीस आणले.
मार्च ८२ : अमेरिकेतील
पेनसिव्हानिया राज्यात हॅरिसबर्गजवळच्या अणूवीज केंद्रात अपघात होऊन शेकडो जण
मृत्यूमुखी पडले.
डिसेंबर ८४ :भारतात
भोपाळ इथल्या युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन पंचवीसशे लोक
मरण पावले वीस हजारांहून अधिक जायबंदी झाले.
२६ एप्रिल ८६ :सोव्हिएत
युनियनच्या युक्रेन प्रांतातल्या चेर्नोबिल अणुभटी स्फोट झाला. त्यामुळे सभोवतालचे
१ लाख ३१ हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र प्रदूषित झाले. सगळया युरोपभर
किरणोत्सजारची पातळी वाढली. तीन लाख नागरिकांचे पुनर्वसन करावे लागले. नंतर
त्यांच्यात रक्तक्षय व रक्तविकारांचे प्रमाण वाढल्याचे दृष्टीस आले. या भागातले
वनस्पतिजीवनही नष्ट होत आले आहे.
१९८७ :आपले
सर्वाचे भविष्य हा ब्रुडलॅड अहवाल प्रसिध्द झाला. एकविसाव्या शतकात समतोल विकास
कसा साधता येईल आणि विकसित व विकसनशील देशांमधील संबंध कसे सुधारता येतील यासाठी
विश्र्वव्यापी कार्यक्रम या अहवालात आहे.
२४ मार्च १९८९ :अमेरिकेचे
एक्झॉन वाल्डेझ हे तेलवाहू जहाज फुटले. त्यामूळे एक कोटी गॅलन क्रुड ऑईल तीन हजार
चौरस मैल समुद्र क्षेत्रावर पसरले. तीनशेपन्नास मैलांचा सागर किनारा या तेलाने प्रदूषित
झाला. लाखो जलचर व समुद्रपक्षी यांची जीवहानी झाली.
जानेवारी १९९१ :अमेरिका-
इराक यांच्या खाडीयूध्दात शेकडो तेलविहीरींना आगी लावण्यात आल्या. त्यामूळे
पिण्याचे पाणी व वातावरण प्रचंड प्रमाणात प्रदूषित झाले.
याशिवाय १९४० मध्ये अमेरिकेतल्या लॉस एंजल्स
शहरावर संध्याकाळी प्रचंड धुर पसरला. त्या धुरामूळे कित्येक नागरिकांना श्र्वास
गुदमरल्यामुळे मृत्यू ओढावला होता. तर १९५२ मध्ये लंडन शहरावर अशाच प्रकारच्या
घटनेमुळे पाच हजारांवर व्यक्ती मरण पावल्या कारखान्यांतून निघणारा धूर आणि
वातावरणातल्या आर्द्रतेमुळे निर्माण होणारे धुके यांच्या संयोगामूळे स्मॉग तयार
होऊन ते वातावरणात दाट थराने दीर्घकाळ टिकून राहिले होते.
अशा तर्हेच्या शेकडो लहानमोठया परंतु तेवढयाच
गंभीर, धोकादायक
घटना या काळात घडत राहिल्या. त्यामुळे सगळयाच देशांना याचा धोका पोहोचत गेला.
Comments
Post a Comment